Wednesday 10 July 2013

पत्रकार मित्रांकडून फीडबॅक

मी जुलै 2011 मध्ये राज्य निवडणूक आयोगात जनसंपर्क अधिकारी म्हणून रुजू झालो. त्याचदरम्यान महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या मोठ्या प्रमाणावर निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये मी माझी बातमीदारीची हौस भागविण्याचा प्रयत्न केला. अर्थात, मा. राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण मॅडम आणि आयोगाचे तत्कालीन अपर मुख्य सचिव चाँद गोयल साहेब यांच्या विश्वासामुळे ते शक्य झाले. दररोज सकारात्मक आणि वैविध्येपूर्ण प्रसिद्धिपत्रके देण्याचा प्रयत्न करीत होतो. तसेच सातत्याने मंत्रालय बीटसह अन्य पत्रकारांच्याही संपर्कात होतो. त्यांनी खूप सहकार्य केले. निवडणुका झाल्यानंतर त्याबद्दल त्यांना आभाराचा मेल पाठविला. त्यावर अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया नोंदविल्या. त्याचेच हे कृतज्ञतापूर्वक स्मरण...
-------------------------------------------------------------------------------
धन्यवाद...तुमच्या मेलचा चांगला फायदा झाला..पहिल्यांदाच अशी अधिकृत माहिती चांगल्या  पद्धतीनेबिनचूक पाठवण्यात आली...आपले आणि आयोगाचे मनपूर्वक आभार.  
अनिल पौलकर,
पत्रकारलातूर.

अनिल पौलकर यांच्या मताशी मी सहमत आहेपहिल्यांदाच असा काही प्रयोग झाला आणि यशस्वी झालाजगदीश मोरे सर आपले विशेष अभिनंदन आणि आभारकाल विशेषतः उल्हासनगरची आकडेवारी मिळणे कठीण होऊन बसेल होते त्यावर आपल्या ऑनलाईन यंत्रणेने खूपच मदत झालीपुन्हा एकदा आभार.... 
Raviraj Vikram Gaikwad

Sub Editor (Central Desk),
Pune Sakal, 595, Budhwar Peth, Pune.Cel: 9870904147

https://mail.google.com/mail/ca/images/cleardot.gifAjit Mandhare mandhare.ajit7@gmail.com to me
आपलेही मनापासून आभार.....
तुमच्या माहितीमुळेआम्ही संपुर्ण निवडणूकित
नेहमी अपडेट राहत होतो......
IBN Lokmat
Sent From My iPhone4s 

alok.jatratkar@gmail.com to me
U have done a great job. Keep it up.
Sent from BlackBerry® on Airtel

Many thanks Jagdish you were wonderful!

best
Meena Menon
Deputy Bureau Chief
The Hindu
mobile – 9820052611, fax 022-22829624

Thank you

Amberish,DNA
Amberish Kathewad Diwanji
DNA [Daily News & Analysis]
Mumbai 400 013 INDIA(+91) 98213 43501
Rajendra Hunje 
Well done Jagdish !!!
Rajendra Hunje

Deputy News Edito, IBN Lokmat

sunilghume@gmail.com to me
Jagdish,

V should thank u because our experience with EC was not so good. But v don't have complaint this time as u were there. Gud work done by u and team EC.
Thanx n regards,
- Sunil Ghume,
Chief  Reporter, Nawshakti
Sent from my BlackBerry® Smartphone on Loop Mobile

ameytirodkar@gmail.com 
Excellent Jagdish !! 

Regards
Amey Tirodkar
New Delhi
Sent on my BlackBerry® from Vodafone

Sushrut Jalukar 
सन्मित्र जगदीश मोरे साहेब

.., 
आपण वेळोवेळी निवडणूक आयोगातर्फे पाठवलेली माहिती आणि अपडेट्समुळे आमचे पोर्टल आणि माझ्या छोट्याशा ब्लॉगसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेआपल्यासारखे अधिकारी आयोगास लाभल्यामुळे सु-नि-योजनांमध्ये अधिकच भर पडेल यात शंकाच नाही... भविष्यातही याचप्रकारे बातम्या व माहिती संदर्भात सहकार्य अपेक्षितधन्यवाद
सुश्रुत जळूकरवेबदुनियामराठीइंदौर

Sharad Vyas sharad.vyas@timesgroup.com to me
thanks a ton
Times of India,

satish lalit satishlalit@gmail.com to me
जगदीशउत्तम कामगिरीखूप उपयोग झालाअभिनंदन !
माहिती तंत्रज्ञानाचा असाच वाढता वापर शासकीय प्रसार माध्यमांकडून झाला पाहिजे
सतीश लळीत
मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी,

०२२-२२०२ ४९०१ / ९४२२४ १३८००

https://mail.google.com/mail/ca/images/cleardot.gifYogita Limaye yogita.limaye@gmail.com to me
Thank you for your help !

Regards,
Yogita
https://mail.google.com/mail/ca/images/cleardot.gifVijay Chormare vijaychormare@gmail.com 
Thanx Jagdish & Congrats !
Prahar

https://mail.google.com/mail/ca/images/cleardot.gifrahigaikwad@gmail.com to me
A big thank you to you too.

Rahi, The Hindu

neha.purav@gmail.com to me
Thank you jagdish!keep it up!
Deshonnti
Sent on my BlackBerry® from Vodafon

धन्यवाद मोरे साहेब,
आपल्या सहकार्यामुळे आणि वेळेत बातमी देण्यामुळे निवडणूकविषयक बातम्या महान्यूजच्या वाचकांपर्यंत पोहोचणे शक्य झालेयापुढे निवडणूक नसतानाही आपला लोभ असाच राहील याची खात्री आहेपुन्हा एकदा धन्यवाद.
 - संतोष तोडकर आणि टीम महान्यूज
Dear Jagdishji
manapurvak dhanyawaad,...
Thanks very much.
Vikram Jadav
Chief Reporter
Vritta Manas

धन्यवाद...तुमच्या मेलचा चांगला फायदा झाला..पहिल्यांदाच अशी अधिकृत माहिती चांगल्या  पद्धतीनेबिनचूक पाठवण्यात आली...आपले आणि आयोगाचे मनपूर्वक आभार.  -- 

With regards,
Vasant Bhosale, Sakal, Pune

मित्राजिंकलस....लई भारी...
Nishikant Todkar

Maharashtra (India)
(M) +919881747323


Thanks Jagdish.
Be in touch and send me your contact number.
Regards,

Ashish Jadhav, 
Correspondent DNA, Diligent Media Corporation Limited,
1099/B, 1st Floor, Shirole House, Model Colony, Pune 411 014
(M) 91-9325171273

Sanjay Vhanmane sanjaycrime100@gmail.com to me
thank u...apan mast jawabdari par padali ahet...
Maharashtra Times

Namaskar... 
Dhanyawad
Narendra Kothekar

Mumbai Bureau Chief
TARUN BHARAT
(Belgaum,Goa,Kolhapur,Sangali,Satara,Ratnagiri & Sindhudurg)

9920602303
 nkothekar@gmail.com

shriram shriram.pawar@esakal.com to me
Thanks a lot for your valuable and timely inputs by you.

Thanks again.
Shriram Pawar, Editor, Sakal, Kolhapur
Sent from my BlackBerry® smartphone from !DEA

https://mail.google.com/mail/ca/images/cleardot.gifAbhay Deshpande abhaydesh66@gmail.com to me
HI  jagdish  great job u done. thanks          

 Abhay Deshpande ,
Samana, Mumbai 

https://mail.google.com/mail/ca/images/cleardot.gifhttps://mail.google.com/mail/ca/images/cleardot.gifSurendra Gangan 
Dear Jagdish
In fact, we should thank you for your co-operation and updated information all the time. Your were always available on your phone, if not in office, at odd hours.
Thanks a lot.
Surendra Gangan
DNA

sunjay awate 
Dear Jagdish
 You have changed the image of government PR
What you did, is not only outstanding, but beyond imagination also
PR is not easy task, I know
Political parties are prepared to appoint PR persons on higher packages,
but they are not getting of that type.
Congratulations to u for your particular, passionate PR!
 Wish you the Great Luck
Editoe In Chief, Krushiwal

ashish.jadhao@ibnlokmat.tv 
Dear Jagdish, u have done fantastic job. All the mess done by madam, u covered it well with ur immediate press releases. Thanx once again.
IBN Lokmat
Sent on my BlackBerry® from Vodafone

vilas0909@gmail.com to me
Gr8 job jagdishji
TV9
Sent on my BlackBerry® from Vodafone

https://mail.google.com/mail/ca/images/cleardot.gifKumar Kadam mahavrutta@gmail.com to me

आपण घेतलेल्या परिश्रमाबद्दल धन्यवादआपल्यामुळे आमच्या संस्थेतील नव्या दमाच्या अनेक पत्रकारांना निवडणूक आयोगाच्या कामकाजाची नीटप्रकारे माहिती होऊ शकली हे आपले यश आहेकुमार कदममुख्य संपादकमहावृत्त

antosh Pradhan sanpradhan@gmail.com to me
Dear Jagdish

well done in all election processes.we jurno like esavey work done by
you and election commission. all the best and keep it up.
Regards
Santosh Pradhan/ Loksatta

aniket joshi aniketsjoshi@hotmail.com to me
dear jagdish keep it up!

-aniket joshi,

Deepak Bhatuse deepakbhatuse1@gmail.com to me
जगदिश खूप खूप धन्यवादनिवडणूक काळात तुझ्याकडून खूप सहकार्य मिळाले..
पुन्हा धन्यवाद,
Deepak Bhatuse, Z 24 TASS

kiran tare kiran.tare@gmail.com to me
In fact, the media people should thank you for the work you have done. As I mentioned earlier, you are the first PRO in the election commission who is "working."
Thanks,
Kiran, INDIA TODAY

aziz ejaz aziz.ejaz@gmail.com to me
good morning, jagdish saaheb,

thanks  a lot,for your co-opration

 Sunil Chavan chavan.sunil@gmail.com to me
Thanks Jagdish for wonderful co-operation. Wishing you all the best.
sunil

Prasad Kathe prasadk@ndtv.com to me
Manapoorvak Abhinandan aani Sahakaryaabaddal Dhanywaad
 Prasad Kathe, NDTV

आदरणीय जगदीश जी,

मैं एक चीज के लिए और आपकी सराहना करना चाहूंगाकि आप अपनी भाषा में यूनीकोड का इस्तेमालकरते हुए भाषाई पत्रकारों से संवाद साधने का प्रयास कर रहे हैं । वरना तो केंद्र व राज्य सरकार के कार्यालयों से राजभाषा सप्ताह मनाने का समाचार भी अंग्रेजी में लिखकर भेजा जाता है । धन्यवाद । 
सादर 
ओमप्रकाश तिवारी 
Om Prakash Tiwari

Special Correspondent,  Dainik Jagran, 41, Mittal Chambers, Nariman Point, Mumbai- 400021

sidhaeshwar dukare to me
jagdish---
Thanks to u. and congrulations to y. for your helpful nature.
many many thanks to u.
go ahead.
sidhaeshwar dukare
sakal

anand gaikwad anandgaikwad1234@gmail.com to me
श्रीमान जगदीश मोरे साहेब...
आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये प्रसारमाध्यमांना  अचूक आणि वेळेच्या आत पाठविलेल्या मजकूराबद्दल आपले आणि निवडणूक आयोगाचे हार्दिक अभिनंदन.
भविष्यातही आपल्याकडून अशीच मदत होत राहिलअशी अपेक्षा आहे...
स्नेहांकित
आनंद गायकवाड
दैकृषीवल मुंबई
 9821366658

माजगदीश मोरे,
महानगरपालिकानगरपालिकाजिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या प्रसिद्धिपत्रकांच्यामाध्यमातून आपण सातत्याने मेलद्वारे संपर्कात होतोयापुढेही राहूच... आपल्या सहकार्याबद्दल आभार...

धन्यवाद.
योगेश बिडवाईदैलोकमत.
Thanks foe all the support and help during the election time Hope you continue to extend your help as always…
Sachin Ghatpande,
SMS Chief, Chintan Group,
9921243103, 20-2-2012, 15:55:06

Good show today, great job.
Mrutunjay Bos, Sakal Times,
9870777127, 17-02-2012, 23:13:02

Thank you for your help.
Swati Kher, The Indian Express
98199168867, 18-02-2012, 21:36:01

Congartulation to you & your entire SEC team.
Prashant Hamine
Spl. Crspdt, Afternoon Despatch & Courier.
9892068197,17-02-2012, 22:59:17

Hearty congratulation officials and staff of election commission for their efforts. You really deserves compliments. Especially EC website is very helpful.
Anirudha Ashtputre,
PRO to CM,
9323976231, 17-02-2012, 18:58:25

Sir, Thank u very much for your Co-operation.
Mayur Chavan,
9372153331, 13-02-2012, 13:50:29
------


Wednesday 3 July 2013

आनंदमय जीवन प्रवासासाठी


श्री. बिपिन मयेकर यांचे ‘मी मुंबईकरहे पुस्तक नुकतेच वाचले. जीवनातले ताणतणाव, चिंता, भीती, संघर्ष आदी वेगवेगळ्या घटकांवर प्रकाश टाकत सकारात्मक मते आणि विचार विकसित करण्याचा प्रयत्न लेखकाने या पुस्तकात केला आहे.
पल्लवी फौंडेशनने अलीकडेच प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या नावात मुंबई असले तरी त्यातील संदर्भ सर्वठायी लागू पडणारे आहेत. सकारात्मक व प्रेरणादायी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मुळात श्री. मयेकर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग (एनएलपी) प्रशिक्षक आहेत. एनएलपी म्हणजे सर्वोत्तमपणाचा अभ्यास. यातील न्यूरोचा संबंध मज्जातंतू आणि पंचेद्रियांसंदर्भात आहे. (बघणे, ऐकणे, अनुभवणे, चव घेणे व वास घेणे) लिंग्विस्टिक म्हणजे भाषाशास्त्र. यात शब्दांचा यथायोग्य वापर, शब्दांचा मेंदूवर होणारा परिणाम, मेंदूकडून शब्दांचा होणारा वापर व देहबोली यातून भाषाशास्त्राशी असलेले संबंध प्रतिबिंबित होतात. प्रोग्रामिंगचा उल्लेख विचार, भावना आणि कृतिसंदर्भात आहे.
एनएलपीच्या माध्यमातून मानसिक जडणघडणीची कुंडली मांडता येते. योग्य मानसिक जडणघडण झाल्यास कार्यक्षमतेत वाढ होऊ शकते. एनएलपी प्रशिक्षणाच्या मदतीने विचारसणीत, भावभावनांत, कृतीमध्ये पर्यायाने जगण्यात आमूलाग्र बदल घडवून आणणे शक्य असते. त्यातून जुन्या मानसिक आघातातून माणसाला मुक्त करणे, अंतर्मनातील गुंता सोडविणे, सुखद मन:स्थिती प्राप्त करणे, वाईट सवयी घालविणे, तसेच आत्मविश्वास व उत्साह निर्माण करण्याचे कामदेखील अल्पावधीत शक्य होते, असा दावा केला जातो.
श्री. मयेकर यांची अमेरिकेच्या नॅशनल फेडरेशन ऑफ न्युरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगया जागतिक संघटनेतर्फे जगातील 10 ‘मास्टर ट्रेनर ऑफ एनएलपीम्हणून जून 2012 मध्ये निवड करण्यात आली होती. यावरून श्री. मयेकर यांची एनएलपीमधील मास्टरी लक्षात येते. पण श्री. मयेकर यांची ही मास्टरी आणि एनएलपीचे दावे बाजूला ठेऊन पुस्तक वाचले तरी ते प्रेरणादायी वाटते. त्यांचे लिखाण मानसशास्त्राच्या अंगाने जाते. वाचकाच्या उणिवांवर बोट ठेवते. त्याला न्यूनगंडाच्या फेऱ्यातून सोडविण्याचा प्रयत्न करते. गर्वहरण करून आत्मप्रेरणेला फुंकर घालण्याचेही काम करते.
पुस्तक वाचताना मी केवळ मुंबईतल्या गर्दीतला एक भाग आहे की या गर्दीत माझीसुद्धा काही ओळख आहे? हा प्रश्न वाचकाला नक्कीच पडतो. गर्दी फक्त मुंबईतच नाही. सर्वच शहरे हळूहळू गर्दीने व्यापली जात आहेत. सर्वांसाठीच हा प्रश्न जिव्हाळ्याचा झाला आहे. त्याचे उत्तर सगळ्यांनाच या पुस्तकात सापडेल, असे नाही. पण बऱ्याच जणांना ते त्या दिशेने विचार आणि कृती करण्यासाठी उद्दिक्त करु शकते. आला दिवसगेला दिवस म्हणत जगणारेही असतात आणि धावपळीत जीवनरसाचा आनंद घेणारे आनंदयात्रीही असतात. आनंदमय जीवनसाठी सफलतेच्या दिशेने प्रवास करताना सोबतीला ज्ञान, कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन, प्रभावी विचारसरणी, कणखरपणा, द्रष्टेपणा, उत्साह, चिकाटी, स्नेहसंबंध, धाडस, संयम; तसेच वेळ आणि ताणतणावाच्या नियोजनाबरोबर थोडा धूर्तपणाही हवा असतो. तोच धागा पकडत विविध उदाहरणे आणि रुपकांतून जीवन प्रवासाचा मार्ग उलगडून दाखविण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.
वाहून गेलेले पाणी मागे वळून परत फिरत नाही. आयुष्यातून वजा झालेला दिवससुद्धा परत येत नाही. दिवसच काय, वर्षेही वजा होत जातात! याचे भानच राहत नाही. उत्तरआयुष्यात कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. भीतीपोटीच आयुष्य खर्ची झालेले असते. भीती हाच यश आणि आनंदायी जीवनातला सर्वात मोठा अडसर असतो. भीती अनेक प्रकारच्या असतात. टीका होण्याची भीती, नाकारले जाण्याची भीती, अपयशाची भीती, हवे ते न मिळण्याची भीती आणि आहे ते गमविण्याची भीती. एकूणच काय? भीतीभीतीआणि भीतीच! भीती वर्तमानकाळात असते. चिंता भविष्यातून निर्माण होते. असे झाले तर किंवा तसे झाले तर अशा प्रकारचे मानसिक खेळ चिंतेतून निर्माण होतात. भविष्यातील या अनामिक जीवघेण्या चिंतेला सामोरे जाऊ न शकणारे व्यसनांच्या आहारी जातात, कधी कधी बेफिकीर होऊन जगतात. काहीजण थेट जीवन संपविण्याचा मार्ग अवलंबतात. ते टाळण्यासाठी बालपणापासूनच संस्कारांची आणि वास्तव जीवनाची नाळ जोडली गेली पाहिजे. मुलांना केवळ गुणांच्या शर्यतीत धावायला भाग पाडून उपयोग नाही. वास्तववादी जीवनाचे भान यायला हवे. अपयशाचे दु:ख पचवता आले पाहिजे. यशाचा उन्माद टाळता यायला हवा. चांगल्या- वाईट जीवनाशी त्यांची ओळख वेळीच व्हायला हवी. कठीण आणि कटू प्रसंगांनाही सामोरे जाता आले पाहिजे. कठीण काळ टिकत नाही; पण दृढ मनाची माणसे टिकतात, हे लहानपणापासूनच बिंबले गेले पाहिजे आणि मोठेपणी त्याचे स्मरण झाले पाहिजे. निराश होऊन जीवन फुकट घालविण्यापेक्षा आशावादी राहत झुंजणे चांगले. दु:खी अंत:करणाने मरत मरत जणगण्यापेक्षा ठामपणे जगणे कधीही चांगले! याची जाणीव यातून होते.
जगातील सर्वोत्तम स्वत:ला हवे असणे ही बाब सर्वसाधारण बनते तेव्हा यायुष्यातील समस्या व ताणतणांवाना खरी सुरवात होते. कपातली कॉफी किंवा चहा म्हणजे आयुष्य. ते अधिक चविष्ट करायला हवे. कप हे साधन आहे. साध्य नाही. सर्वोत्तम कप प्राप्तीसाठी संघर्ष करताना आपण ताणतणाव ओढून घेतो. अहंकारातूनही ताणतणाव येतात. अहंकाराला जरासुद्धा ठेच पोहचली तरी तीळपापड होतो. अहंकार अतिआत्मविश्वास आणि न्यूनगंडातूनही येवू शकतो. न्यूनगंड असुरक्षिततेमुळे किंवा असुरक्षिततेच्या भीतीमुळे येऊ शकतो. अहंकार मात्र नातेसंबंधामध्ये दरी वाढवितो. नम्रपणा नातेसंबंधातील गोडवा वाढवित नेतो. अलीकडे घरांचे क्षेत्रफळ वाढले आहे; पण घरांमध्ये माणसांऐवजी सुखसोयीच जास्त झाल्या आहेत. वस्तुकेंद्रित स्वभावही ताणतणावांना निमंत्रण देत असतो. मीच बरोबरमाझेच सर्नांनी ऐकावे अशा हेक्याने आपण इतरांची मने तुडवतो. माणसांना नकळत दूर सारतो; पण मान काही मिळत नाही. शेवटी निराशाच पदरी पडते. निर्मळ आणि निर्व्याज आनंदाला अशा व्यक्ती नेहमीच पारख्या होतात. आयुष्याच्या दीर्घ प्रवासात मान मागून मिळत नसतो. तो आपल्या नैसर्गिक मोठेपणातून मिळतो. याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.
कुठल्याही गोष्टीचा अभिमान असावा; गर्व नको. गर्वामुळे आपण स्वत:ला श्रेष्ठ समजतो. इतरांना कमी लेखतो. न्यूनगंडही नसावा. न्यूनगंडामुळे आपण स्वत:ला कमी लेखतो. सार्थ अभिमान असणारे स्वत:चा मान राखत इतरांनाही मान देतात. मात्र आपला समजुतदारपणा इतरांनी गृहित धरू नये. अन्यथा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो. याचेही भान राखले पाहिजे. त्याचप्रमाणे पश्चात्ताप असावा; अपराधीपणा नको. उदा. नात्यांच्याबाबतीत चूक झाल्यास पश्चात्तापाची भावना हवी. अपराधीपणाची उजळणी नको. पश्चात्ताप चुकांची जाणीव करून देत सकारात्मक पावले उचलण्यास प्रवृत्त करतो. अपराधीपणा आपल्याला नकारात्मक मन:स्थितीत घेऊन जातो. नाते आले की अपेक्षा आल्याचनाते म्हणजे अपेक्षांची यादी! प्रत्येक नात्यात व्यक्तिगत भूमिका बदलते. प्रत्येक भूमिकेत आपले हक्क आणि आपल्या जबाबदाऱ्या ठाऊक असायला हव्यात. आपल्या प्रमुख नात्यांमधील हक्क आणि जबाबदाऱ्या आपल्याला माहीत आहेत का? हा प्रश्न ‘मी मुंबईकरहे पुस्तक वाचतांना पडतो.   
पल्लवी फौंडेशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील सर्वच विचार किंवा उदाहणे सगळ्यांनाच आवडतील, असे नाही. जे जे चांगले, जे जे आवडेल ते ते घ्यावे, या भावनेतून हे पुस्तक वाचल्यास नक्कीच आनंद मिळू शकतो. पुस्तकातील भाषा साधी आणि सोपी आहे. त्यातील उदाहणेही आपल्या 
दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न श्री. मयेकर पल्लवी फौंडेशनला देणार आहेत. त्यातून रक्तपेढी उभारण्यास हातभार लाभेल, अशी फौंडेशनला अपेक्षा आहे.
पुस्तकाचे नाव: मी मुंबईकर
लेखक: बिपिन मयेकर (9819001215)
ईमेल: myself.bipin@yahoo.co.in  admn@prasannahrd.com
प्रकाशक: पल्लवी फौंडेशन
किंमत: रु. 200
संपर्क: श्री. प्रीतम मोहिले (9987069886)